१२ वर्षाच्या निशाला ऑक्सीजन मशीनने मिळाली जगण्याची नवी उमीद

52

शिवसेना (उबाठा) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे चा पुढाकार

चंद्रपुर

.            बारा वर्षाच्या चिमुकलीला आजाराने ग्रासले . त्या चिमुकलीची ऑक्सीजन लेवल नेहमी कमी होत असल्याने तिला वारंवार ऑक्सीजन द्यावे लागत होते . डॉक्टरांनी ऑक्सीजन मशीन घेण्याचा सल्ला दिला मात्र घरची परिस्थिति हालाकीची असल्याने ऑक्सीजन मशीन घेणे शक्य नव्हते अशातच शिवसेना (उबाठा) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रविंद्र शिंदे यांना माहिती मिळताच तात्काळ स्वखर्चाने निशाला ऑक्सीजन मशीन भेट दिली. यामुळे १२ वर्षाच्या निशाला जगण्याची नवी उमीद मिळाली.

.            वरोरा तालुक्यातील सोईट (नविन) येथील निशा कांबळे ही मागील काही दिवसांपासून आजारी आहे. कांबळे कुटूंबांची आर्थिक स्थिती नाजूक यामुळे निशाच्या उपचारात असंख्य अडचणी निर्माण होत आहे. तिच्या आजारपणात ऑक्सीजन मशीनची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. निशाचे पालक तिच्या आजाराने फारच दुःखी झाले. रविंद्र शिंदे यांच्याशी त्यांनी संपर्क साधून लेकीच्या आजाराची करून कहानी कथन करुन मदतीची अपेक्षा व्यक्त केली. रविंद्र शिंदे यांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ निशाच्या आजारपणात ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून दिली. तसेच अधीक मदतीचे आश्वासन सुध्दा दिले.निशाच्या आजारपणात निस्वार्थी वृत्तीने मदत केल्या बद्दल निशाच्या पालकांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या प्रति कृत्यज्ञता व्यक्त केली.
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात आम्ही जनसेवेत सदैव तत्पर आहोत. गरजूंनी आरोग्य विषयक मदतीसाठी संपर्क साधावा. असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधान सभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.