छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात विद्यापीठ दिवस साजरा . 

125

वरोरा               सनय बहुद्देशीय संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय सूर्ला (बोर्डा) वरोरा येथे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक या विद्यापीठाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष . सुधाकर खरवडे यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

.           कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात सुरु असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाची माहिती या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना देण्यात आली. बी. ए. (प्रशासकीय सेवा) या अभ्यासक्रमातून भविष्यात विद्यार्थ्यांना सरकारी सेवेत कसे रुजू होता येईल याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष. सुधाकर खरवडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी वैष्णवी भोयर तर आभार प्रदर्शन मयूर डांगरे याने केले.

.            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सातपुते मॅडम, प्रा. पाटील मॅडम, प्रा. खंडाळकर, प्रा. खामकर  तुषार कडू, हर्षद ढवस, रमेश जीवतोडे व महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.