महिला सरपंचाला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ

109
  • बिअर बारच्या ना हरकत पप्रमाणपत्र प्रकरण 
  • चार जणांवर गुन्हे दाखल*

नागभीड;-

मोहाडी येथील काही नागरिकांनी बिअर बार सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाण मिळवून मिळवण्यासाठी ग्रामपंचायतला अर्ज केला असता लोकांचा विरोध असल्यामुळे ती ग्रामसभा तहकूब झाली. ग्रामसभा तहकूब होण्यामागे सरपंचच्या यांचा हात आहे म्हणून भर चौकात महिला सरपंच अस्मिता पेंदाम यांना अश्लील व जातीवाची शिवीगाळ करण्यात आली याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून चार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, रोहित रिधिस्वर वारजुकर यांनी बिअर बार सुरु करण्यासाठी मोहाडी ग्रामपंचायत ला अर्ज सादर केला. त्या अर्जाचा विचार करून 21/8/2023 ला विशेष ग्रामसभा लावण्यात आली . ग्रामसभेला पाहिजे त्या प्रमाणात उपस्थिती नसल्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात आली. दुसऱ्या दिवशी झेंडा चौक मोहाडी येथे चार लोकांनी अश्लील भाषेत व जातीवाचक शिवीगाळ केली .सरपंच अस्मिता पेंदाम हिने नागभीड पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली . नागभीड पोलीस स्टेशन यांनी हि तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपूरी याना सुपूर्द केली. प्राप्त तक्रारी वरून आणि सरपंच यांच्या सांगण्यावरून रोहित सिध्देश्वर वारजुकर, पटवारी किसन ठाकरे, अंजून मोरेश्वर वाजुरकर, रोशन नारायण गजभे रा.मोहाडी मोकासा यांच्याविरुद्ध भादंवी २९४/५०६/५०९/३४ अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(आर),३(१)(एस) अन्वये गुन्हा दाखल केला पुढील तपास उपविभगीय पोलीस अधिकारी ब्रम्हपूरी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.