भारत विद्यालय चारगाव खुर्द येथे चंद्रायान च्या यशस्वी लँडिंग निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न.

75

 

वरोरा

            भारत विद्यालय चारगाव खुर्द येथे दिनांक 23 ऑगस्ट 2023 ला सायंकाळी 6.04 वाजता झालेल्या चंद्रायान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग निमित्ताने त्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.

विद्यार्थ्यांना याविषयी अगोदरच्या दिवशी थेट प्रक्षेपण पाहण्याबाबत सूचना देण्यात आली होती.त्यानुसार सकाळी 11.30 वाजता विद्यालयाचे मुख्याध्यापक .प्रीतमदास सोनारकर यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार चंद्र मोहिमेवर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आली.अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सोनारकर आणि ज्येष्ठ शिक्षक पारेलवार सर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

याप्रसंगी चंद्र मोहिमेच्या यशस्वीतेकरिता भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) मधील सर्व शास्त्रज्ञांचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक अनिल गजबे यांनी केले .सदर कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, कर्मचारी व भारत वस्तीगृहाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर उपक्रमाचे वरोरा तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात आले.