लोहारा बोळधा मार्गावरील गोधनी नदीवरील पुलावर कठडे लावा

40
  •  नागरिकांची मागणी
  •  अपघाताची दाट शक्यता

प्रतिनिधी नेरी,
नेरीवरून जवळ असलेल्या लोहारा बोळधा मार्गावरील गोधनी नदीच्या पुलाला मागील अनेक वर्षांपासून संरक्षण कठडे नाहीत त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून या अगोदर अनेक वाहने सरळ तोल न साभाळल्यामुळे नदीत कोसळले तसेच अनेक जनावरे सुद्धा पुलावरून कोसळले मात्र जीवितहानी झाली नाही गंभीर इजा होऊन अनेकदा हानी झाल्या आहेत तेव्हा समोर अश्या घटना घडू नयेत यासाठी या पुलावर संरक्षण कठडे संबंधित विभागाने लावून द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे
सदर नदीवर मागील अनेक वर्षांपूर्वी पूल तयार झाले मात्र सवरक्षण कठडे लावले नसल्याचे नागरिक बोलीत आहेत सदर मार्ग या पुलावरून समोर वळण मार्ग आहे वाहने वेगात आले तर वाहनावर नियंत्रण करणे या पुलावरून अवघड आहे आणि नियंत्रित करताना वाहनावरील ताबा सुटू शकतो व वाहन सरळ नदीत पडू शकतो त्यामुळे अपघात घडू शकते आतापर्यंत काही वाहने पडली परंतु वाहनांची तुटफुट झाली परंतु जीवित हानी झाली नाही तसेच अनेक जनावरे सुद्धा नदीत कोसळले कारण अचानक वाहन आल्याने भेदरून खाली पडले त्यामुळे सदर पुलावर कठडे अति आवश्यक आहेत तेव्हा समोर असे काही अपघात किंवा दुःखद घटना घडू नयेत यासाठी संबंधित विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ या नदीपुलावर संरक्षक कठडे लावावे अशी मागणी नागरिक करीत आहेत