करंजी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी वैभव निमगडे

69

 

गोंडपिपरी

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथे दि.(२५) शुक्रवारी ग्रामसभा पार पडली.करंजी हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील असून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची जन्म भूमी असल्याने जिल्ह्यात गावाची वेगळी ओडख आहे.तंटामुक्त समितीची निवडणूक चुरशीची झाली अनेकांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला.यावेळी युवा नेतृत्व वैभव निमगडे यांची बहुमताने निवड करण्यात आली.निमगडे यांनी सर्वांना सोबत घेऊन समितीच्यास ध्येय धोरणानुसार येणाऱ्या प्रत्येक तक्रारींचा योग्य न्याय निवाडा करण्याची ग्वाही दिली.निवडीनंतर शिवसेना शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,जोगापूर शाखा प्रमुख पंकज डांगी,विकी शाहू,छतरसिंग डांगी,अशोक गुंटीवार,धनराज निमगडे,रोहिणी निमगडे,प्रणाली डिंगलवार,सुधाकर बावणे,दिलीप शेटीवार यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करत जल्लोष साजरा केला