अनोळखी इसमाचे विहीरीत प्रेत मिळाले

153

नागभीड

.        तालुक्यातील कीटाळी मेंढा येथे अनोळखी इसमाचे प्रेत दिनांक २६/८/२०२३ ला मिळाले आहे. पोलीस पाटील अरुण मसराम यांच्या तोंडी रीपोर्ट वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमाचे प्रेत हनुमान मंदीर परीसरातील गोट्याच्या विहीरी मध्ये आढळुन आले आहे. मृतकाचे वय अंदाजे ३० ते ३५ दरम्यान असावे. मृतक हा निमगोर्या रंगाचा असुन मजबुत बांध्याचा आहे. उंची १६२ ते १६५ असावी. चेहरा गोल असुन दाढी मीशी काळी पांढरी आहे.डोक्यावर काळे पांढरे केस आहेत.अंगात निळ्या रंगाचा जिन्स पँट असुन त्यावर मागील खिस्यावर xclusive creation असे लिहीले आहे.तर अंगात फुल बाध्याचा शर्ट असुन त्याच्या कालरवर The fire sfirit असे लेबल असलेला शर्ट आहे.कुणाच्या ओळखीचा वाटल्यास कींवा कुणाची मिसींग रीपोर्ट असल्यास पो.स्टे नागभीड येथे संपर्क करावा असे पो.स्टे. नागभीड यांनी कळविले आहे.