शून्य ऊर्जा शीतगृहामुळे चार दिवस भाजीपाला टिकविणे होणार शक्य

52

 

वरोरा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाशी संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय , आनंदवन वरोरा येथील विद्यार्थीनींनी जास्त काळ भाजीपाला टिकवून ठेवण्यासाठी “शुन्य ऊर्जा शीतगृह ” हा महत्त्वकांशी उपक्रम शेतकयांसाठी सुरु केला आहे. या अंतर्गत चिनोरा येथील शेतक-यांना शितगृहाचे महत्त्व पटवुन दिले. या उपक्रमामुळे परिसरातील शेतक-यांना फायदा होणार असुन भाजीपाला जास्त काळ टिकविणे शक्य होणार आहे.

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतगृहाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या शितगृहामध्ये पालेभाज्या , फळभाज्या चार ते पाच दिवस टिकूण राहत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही याचेही महत्त्व या उपक्रमाचे महत्त्व मार्गदर्शन केले.

शुन्य ऊर्जा शीतगृह उपक्रम याकरिता योग्य मार्गदर्शन मिळावे करीता आयोजीत करण्यात आलेल्या या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाकरिता आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. बी. महाजन कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.एन पंचाभाई, आर.एच. रहाटे यांनी विशेष मोलाचे मार्गदर्शन केले. चिनोरा येथील या कार्यक्रमाला आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या कु.सेजल धाकडे, आकांशा महाजन, पूजा बोरकर, वैष्णवी तालकोकुलवार, अनुराधा तिवारी, प्रिती तडस इ. कृषीकन्यांचा समावेश होता.