साहेब पैशे घ्या पण आम्हाला न्याय द्या..!

366
  • तेजस्विनी पतसंस्थेच्या ठेवीदारांची सहाय्यक निबंधक कार्यालयावर धडक

वरोरा

.         येथील तेजस्विनी नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांनी आज बुधवारी सहाय्यक निबंधक कार्यालयात मोर्चा नेत भिक मांगो आंदोलन करत साहेब हे पैशे घ्या पण आम्हाला न्याय द्या अशी  आर्त मागणी केली.

.       वरोरा येथे 2014 साली तेजस्विनी नागरी सहकारी पतसंस्था उघडण्यात आली .तालुक्यातील अनेक किरकोळ व्यापारी, शेतकरी ,शेतमजूर तसेच अनेक ठेवीदारांनी दैनिक ठेव तसेच आवर्त ठेव स्वरूपात पतसंस्थेत पैसे जमा केले. मात्र कर्जाची वसुली न झाल्याने पतसंस्था डबकडीस आल्याचे कारण सांगून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप येथील ठेवीदारांनी केला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष तथा संचालक एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने ठेवीदारांना धमकावून पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पतसंस्थेच्या अभीकर्त्या नलिनी जोगे व रोहिणी पाटील यांनी केला आहे. गेल्या 8 वर्षापासून येथील ठेवीदार कार्यालयात उंबरठे झिजवून सुद्धा न्याय मिळत नसल्याने येथील ठेवीदारांनी आक्रमक रूप घेत सहाय्यक निबंधक कार्यालयात भिकमांगो आंदोलन करत आपली व्यथा मांडली. तसेच तक्रार करत साहेब हे पैसे घ्या पण आम्हाला न्याय द्या अशी आर्त हाक दिली. त्यामुळे या महिलांना न्याय मिळेल की राजकीय दबावाखाली प्रकरण दडपण्याचा येईल हे बघने आता औचित्याचे ठरणार आहे.