भारतीय जैन संघटना चंद्रपूर द्वारे ‘बंधन 2023’ चे आयोजन 

50
  •  केसरीया पार्श्वनाथ जैन मंदिर येथे वधुवर परिचय कार्यक्रम
  • अनोख्या पद्धतीने होणार कौटुंबिक मिलन

चंद्रपुर

अत्यंत आधुनिक तसेच आपल्या धर्माबद्दल अतुट विश्वास असलेल्या जैन समाजाने काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवुन आणले असुन आजच्या युगातील तरुण तरुणींना योग्य जोडीदार मिळावा, त्यांचे वैवाहिक जीवन मंगलमय असावे ह्या दृष्टिकोनातून पारंपरिक विवाह पद्धती सोबतच वधु वर परिचय संमेलन आयोजित करणे सुरू केले असुन त्याच अनुषंगाने भारतीय जैन संघटनेच्या चंद्रपूर शाखेने जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती येथिल केसरीया पार्श्वनाथ जैन मंदिरात स्व. किरीट बाबरीया ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बंधन 2023’ चे आयोजन केले आहे.

ह्या युगात जैन समाजाच्या मुलामुलींनी उच्च शिक्षण प्राप्त केले असुन जगभरात आपल्या प्रतिभेने ह्या युवकांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. वैद्यकीय क्षेत्र असो वा अभियांत्रिकी अथवा मग पारंपरिक व्यवसायी असो की उद्योग जगत जैन समाज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. नव्या युगाशी स्पर्धा करतानाच जैन समाजाने आपल्या परंपरा व संस्कार तितक्याच समर्पण भावनेने जपले आहेत हे विशेष.

लग्न हे केवळ दोन तरुणांचे मिलन नसुन वस्तुतः ते दोन कुटुंबाचे एकत्रीकरण असते. भारतीय संस्कृतीत हा एक संस्कार आहे आणि जैन समाज ह्या संस्काराचे जतन करत असल्याने समाजात विवाह विच्छेद होण्याचे प्रमाण देखिल नगण्य आहे.

एका वेगळ्या पद्धतीने आयोजित होत असलेल्या ह्या बंधन 2023 च्या सोहळ्यात 21 ते 35 वर्ष वयोगटातील विवाहोच्छुक युवक युवतींना प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. संमेलनात उपवर वधु सह दोघांना प्रवेश देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत बैद, नितीन पुगलिया, गोतम कोठारी, दीपेंद्र पारख यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.