भद्रावतीत आज भव्य मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर

49
  • ग्राहक पंचायत, योद्धा संन्यासी पालक-मित्र मंडळ आणि विवेकानंद महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम

भद्रावती : गेल्या काही दिवसांपासून डोळ्याची साथ चालु आहे. डोळ्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. मोबाईल, टिव्हीच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांपासून तर वयस्कांपर्यंत सर्वांनाच डोळ्यांच्या समस्या जाणवत आहे. याच समस्येची जाणीव ठेवुन ग्राहक पंचायत भद्रावती, योद्धा संन्यासी पालक-मित्र मंडळ आणि विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्ररोग तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे.

विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील योद्धा संन्यासी क्लिनिक येथे दि. २३ ऑगस्ट ला भव्य मोफत नेत्ररोग तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. शिबीर सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. या शिबीराला तपासणीसाठी आध्यवी नेत्रालय, चंद्रपूरच्या प्रशिद्द नेत्रराग तज्ञ डॉ. गुंजन इंगळे (कांबळे) उपस्थित राहणार आहे.

शिबीरामध्ये तपासणी किंवा उपचार करणाऱ्या रुग्णांना आध्यवी नेत्रालय, चंद्रपूर यांचेकडून विशेष सुविधा सुद्धा दिल्या जाणार आहे. जसे रुग्णांच्या डोळ्याची मशीनव्दारे मोफत तपासणी, आवश्यक असेल तर रुग्णांना डोळ्याचे ड्रॉप्स मोफत दिले जातील, ज्या रुग्णांना विशेष तपासणीची गरज आहे त्यांना आध्यवी नेत्रालय चंद्रपूर येथे निशुल्क डोळ्याची तपासणी करून देण्यात येईल, आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्यास सवलतीच्या दरात आध्यवी नेत्रालय चंद्रपूर येथे शस्त्रक्रिया करून देण्यात येईल एवढेच नाही तर तपासणी झाल्यावर नंबरचा चष्मा बनवून घ्यायचा असल्यास पुर्ण किंमतीवर २५% सवलत सुद्धा दिली जाईल. हि सवलत एस.आर. ऑप्टिकल, भद्रावती येथे उपलब्ध असेल.त्यामुळे भद्रावतीकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायत भद्रावती, योद्धा संन्यासी पालक-मित्र मंडळ आणि विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांनी केले आहे.