दिनेश पातरे यांची तिसऱ्यांदा तमुस अध्यक्षपदी निवड

80

सिंदेवाही :- ग्रामीण भागातील नागरिकांचे भांडण गावातल्या गावातच मिटवून गुन्ह्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने शासनाने २००७ पासून गावागावात महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले असून दरवर्षी ग्रामसभेच्या माध्यमातून या समितीचे पुनर्गठन केले जाते. त्याच अनुषंगाने सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गडबोरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी दिनेश पातरे यांची तिसऱ्यांदा निवड झाली असल्याने गावातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

ग्राम पंचायत सरपंच शीतल उपरकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये इतर अनेक विषयांसह तंटामुक्त गाव समितीचे पुनर्गठन करणे या विषयावर चर्चा करून समितीचे पुनर्गठन करण्यात आले. व त्यानंतर अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. यामध्ये पुन्हा एकदा दिनेश पातरे यांचेवर गावकऱ्यांनी विश्वास दाखवून त्यांची तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केलेली आहे. गावातील भांडणे गावातच मिटवून, स्वच्छता आणि हागणदारी मुक्ती साठी नेहमीच प्रयत्नात राहणारे पातरे यांनी ग्राम स्वच्छता मोहीम राबविणे, दारू, जुगार, यापासून गावाला मुक्त करणे, गुन्हेगारी पासून गावकऱ्यांना परावृत्त करणे, इत्यादी बाबीकडे लक्ष घालण्याचे यावेळी पातरे यांनी बोलून दाखविले. सूत्रसंचालन ग्रामसेवक अतुल मेश्राम तर ग्राम पंचायत सदस्यांनी गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी असंख्य गावकरी ग्रामसभेला उपस्थित होते.