युवासेना तर्फे एसआरके कंपनी ला आंदोलनाचा इशारा

45

वरोरा

युवासेना वरोरा तालुका तर्फे एसआरके कंपनी च्या प्रोजेक्ट मनेजरला चिमूर वरोरा रोड सुरु करण्यासंदर्भात व भेंडाळा, चारगाव येथील पुलाचे काम करण्यासंदर्भात निवेदन काही दिवसापूर्वी दिले होते. त्या निवेदन ची कोणतेही दखल न घेतल्या मुळे शिवसेना (उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे व युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना तालुका प्रमुख वरोरा ओंकार लोडे व युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले यांच्या नेतृत्वात एसआरके कंपनीच्या अधिकारीना रोडचे व पुलाचे काम सुरु का बर केले नाही याची विचारणा केली त्यावेळी एसआरके कंपनी च्या अधिकारीना अल्टीमेटन दिला की जर येत्या 15 दिवसात काम सुरु नाही केले तर एसआरके कंपनी वर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना तर्फे देण्यात आला.

त्यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख अनिकेत हिवरे, विभाग प्रमुख रवी वाटकर ,निखिल कुळमेथे शाखाप्रमुख वडधा, रोशन नन्नवरे उपशाखाप्रमुख वडधा,वैभव घोडमारे,कपिल धकाते, उत्कर्ष नरड, सूरज सुर्यवंशी , सारंग पाटील , सौरव पोइंकर, सुमेघ भैसारे, गौरव पोईंकर, रोशन चवरे , संचित शिंगरू , त्रिशूल भिसेकर, शिवम शेंडे , अनिकेत नन्नवरे, योगेश हिवरे , करणं पोइंकर, मंगेश भोयर, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.