चांदा फोर्ट ते जबलपूर सुपरफास्ट त्रिसाप्ताहिक इंटरसिटी एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत 

47
  • आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ 
  •  खा अशोक नेते यांचे नागभीडकरांनी मानले आभार 

नागभीडः गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांमुळे नागभीड जं. रेल्वेस्टेशन येथे गाडी क्र. २२१७३ चांदा फोर्ट ते जबलपूर सुपरफास्ट इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनचा थांबा १५ ॲागस्ट पासुन मंजूर झाला. आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन नागभीड येथील थांब्याचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी आमदार भांगडिया यांनी चांदा फोर्ट ते जबलपूर सुपरफास्ट इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रथम प्रवाशांचे रेल्वे स्थानकावर स्वागत केले. तसेच, उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना पेढे भरवून त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. ही गाडी या मार्गावर आठवड्यातून मंगळवार , गुरुवार व शुक्रवार या तीन दिवशी धावणार आहे. नागभीड येथील या गाडीचा थांबा प्रायोगीक तत्वावर असल्याने कायम थांब्यासाठी प्रवाश्यांनी या गाडीचा वापर अधिकाधिक करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

या गाडीला नागभीडसह आता गोंदिया , बालाघाट , नैनपुर व मदनमहल असे पाच थांबे असणार आहेत . या त्रिसाप्ताहिक गाडीमुळे जबलपुर व भेढाघाट सारख्या पर्यटन , व्यापारी व धार्मिक स्थळी जाण्याची थेट सुविधा प्राप्त होणार आहे. सोबतच प्रयागराज ( इलाहाबाद ) , लखनौ व वाराणशी येथेही जाण्यासाठी हा मार्ग अतिशय जवळचा व कमी वेळेचा असल्याने या मार्गाचा प्रवासी निश्चितच अधिकाधिक वापर करतील असा विश्वास या गाडीच्या नागभीड जं. या महत्वपुर्ण स्टेशनवरील थांब्यासाठी खा. अशोक नेते यांच्या माध्यमातुन सातत्याने पाठपुरावा करणारे दपुम रेल्वे बिलासपुर झोनचे झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांनी व्यक्त केला आहे.

 

यावेळी दपुम रेल्वे नागपुर मंडल चे अवर मंडल रेल प्रबंधक गोरक्ष जगताप , एसीएम अविनाश आनंदकुमार , मंडल सुरक्षा आयुक्त दीपचंद आर्य , दपुम रेल्वे बिलासपुर झोनचे झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती . भारतीय स्वातंत्र्यदिनी शुभारंभ असल्याने यावेळी नागभीडकरांनी या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती .

याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजुकर , भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोष रडके, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, नागभीड कृ.उ.बा. समिती संचालक गणेश तर्वेकर, न.प. नागभीड चे माजी सभापती सचिन आकुलवार, भाजपा नेते राजु देवतळे व मनिष तुमपल्लीवार , जि. प. चे माजी सभापती ईश्वर मेश्राम , माजी सरपंच जहांगीर कुरेशी , माजी नगरसेवक शिरिष वानखेडे , रामदास बहेकर , हेमंत नन्नावरे , राजु पिसे , व्यापारी संघाचे जयंतीभाई पटेल, गोपाल गिरीपुंजे ,मधुकर डोईजड , पवन नागरे, प्रमोद तर्वेकर ,रमेश ठाकरे , तसेच भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते, रेल्वे प्रशासन अधिकारी/कर्मचारीगण आणि प्रवासी उपस्थित होते.