आठव्या वर्गातील विद्यार्थिनीचा विषारी सर्प दंशाने मृत्यू

44

 

  • विसापुरातील स्वातंत्र्यदिनी घडली घटना
  • तिच्या अकाली मृत्यूने गाव हळहळला

बल्लारपूर : स्वातंत्र्य दिनाचा सोहळा गावात साजरा केला जात होता.या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ती उत्सुक होती.तयारी करण्यासाठी ती बाथरूमला गेली.मात्र त्या ठिकाणी काळ म्हणून विषारी साप दबा धरून होता.त्याने तिच्या पायाला दंश केला.तिला उपचारार्थ चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.मात्र बुधवारी दुपारी १२ वाजता उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. जयश्री हरिश्चंद्र धागडी ( 13 ) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती लोकमान्य टिळक विद्यालय ,चंद्रपूर येथील शाळेत आठव्या वर्गात शिक्षण घेत होती.तिच्या अकाली मृत्यू ने गाव हळहळला आहे.

जयश्री सकाळी घरातील बाथरूम मध्ये शाळेला जाण्यासाठी तयारी करण्यासाठी गेली.ध्यानिमनी नसताना दबा धरून असलेल्या विषारी सापाने तिच्या पायाला दंश केला.तेव्हा ती घरात आली.मात्र विषारी साप तिच्या पायाला घट्ट पकडून जोरदार दंश केला.यावेळी शेजारी असलेले सुभाष भटवलकर व घरच्यांनी तातडीने तिला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जयश्रीचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.विषारी सापाचे विष शरीरभर गेल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली.तरीही डाक्टरांनी आशावाद सोडला नव्हता.तिला ४८ तासात जोखमीचे असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.मात्र डाक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून देखील सर्प दंशाने तिची प्राणज्योत २४ तासातच मालवली.

जयश्री ही आई वडिलाची लाडकी लेक होती.ती शिक्षणात देखील हुशार होती.सर्वांची लाडकी लेक अचानक अकाली मृत्यू ने गेल्यामुळे सारेच गावकरी हळहळ व्यक्त करत आहे.