बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावर डांबर आईल टँकर उलटले

56
  • वाहतूक खोळंबली
  • सुदैवाने  मोठी दुर्घटना टळली

बल्लारपूर :   डांबर आईल घेऊन चंद्रपूर वरून बल्लारपूर कडे जात असलेल्या  टँकर चंद्रपुर बल्लारपुर मार्गावर उलटला . रस्त्यावर डांबर ऑइल सांडले व मधोमध टँकर उलटल्याने काही काळ चंद्रपुर बल्लारपुर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती . या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही . सदर घटना सोमवारी सकाळी ७ वाजता दरम्यान चंद्रपूर – बल्लारपूर  मार्गावर विसापूर गावाच्या हद्दीत भिवकुंड गावाजवळ घडली. पावसाळी वातावरण असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर येथून टँकर क्रमांक एम.एच.34- ए १३९८ हे डांबर आईल भरून बल्लारपूर कडे जात होता. दरम्यान भिवकुंड जवळील नाल्याच्या वळणावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रित सुटले  वाहन दुभाजकावर आदळले. त्यानंतर टँकर पलटी होऊन रस्त्यावर आईल सर्वत्र पसरले. यामुळे बल्लारपूर – चंद्रपूर मार्गांवरील वाहतूक काही काळ खोळंबली होती . या अपघातात वाहन चालक व वाहकाला किरकोळ दुःखापत झाली.

या अपघाताची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमन दलाला पाचरण करून मार्ग स्वछ करून वाहतूक सुरळीत केली.आज सकाळपासून पावसाळी वातावरण असल्यामुळे टँकर मधील आईलने पेट घेतला नाही.परिणामी मोठी दुर्घटना टळली.टँकर चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे.