राजू नंदनवार यांची संजय गांधी निराधार समितीवर निवड

123

सिंदेवाही : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे राज्यातील निराधार व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली संजय गांधी निराधार योजने करिता तालुका स्तरावर समिती गठित केली जाते. सिंदेवाही तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समितीवर वासेरा येथील राजू नंदनवार यांची निवड झाली असल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

संजय गांधी निराधार योजने अंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मदत करणे, निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारणे, त्या व्यक्तींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे, निराधार व्यक्तींना आत्मनिर्भर व सशक्त बनविणे,इत्यादी उद्देश घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने सदर योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत ६५ वर्षांवरील निराधार पुरुष, महिला, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त असणारे व्यक्ती, विधवा, घटस्फोटित महिला, इत्यादींना या योजनेमधून अर्थसाहाय्य दिल्या जाते. नुकताच जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार, आणि पालकमंत्री यांचे शिफारशीनुसार सिंदेवाही तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची या समितीवर निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून कमलाकर सिद्धमशेट्टीवार, तर सदस्य म्हणून राजू नंदनवार, मुरलीधर मडावी, किशोर, भरडकर, देवराव कोठेवार, प्रेमकुमार डेंगे, अरुण साहरे, तुळशीराम गायकवाड, नत्थू मेश्राम, छाया हाडगे, इत्यादींची तालुका समितीवर निवड झाली असल्याने सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.