कृषी कन्यांनी तयार केली शेतकऱ्यांच्या दारी परसबाग

63

वरोरा : -डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याशी संलग्नित, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन बरोरा येथील विद्यार्थिनींनी 08 ऑगस्टला ‘हॉर्टिकल्चर दिनानिमित्य’ चिनोरा येथील शेतक-यांच्या घरी जावुन त्यांच्या अंगणात परसबाग तयार केळी करण्यात मदत करीत भाजीपाल्याच्या रोपांची लागवड करून मार्गदर्शन केले.

  1. .     हॉर्टिकल्चर दिनाच्या’ निमित्ताने या कृषी- कन्यांनी शेतकरी मित्रांना भाजीपाला लागवड, त्या झाडांचे संगोपण या बाबत मार्गदर्शन करित प्रात्यक्षिका द्वारे त्यांची परसबाग फुलविण्यात मदत केली.सदर उपक्रम आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस पोतदार कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वि. महाजन कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचाभाई, डॉ अनिल भोगावे यांच्या मार्गदर्शनाच्या मुळे करण्यात आला. उपक्रम पूजा बोरकर, सेजल धाकडे, आकांशा महाजन,वैष्णवी तालकोकुलवार, प्रिती तडस, अनुराधा तिवारी यांच्या सोबतच्ची वरिष्ठ युवा कृषिकन्यांनी सहकार्य केले.