आजीच्या अंतिम संस्कारानंतर नातवाने स्मशानभूमीत केले वृक्षारोपण

55
  • नातवाची आजीला अनोखी श्रद्धांजली
  • खांबाडा येथील मंगेश धाडसे यांचा  अभिनव उपक्रम 

नेरी,

चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगेश धाडसे यांच्या आजीचे १० ऑगस्ट ला निधन झाले . त्यांच्यावर खांबाडा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला . आजीची आठवण म्हणून दुसर्याय दिवशी नातवाने स्मशानभूमीत वृक्षारोपण करून आजीला अनोखी श्रद्धांजली दिली . नातवाच्या या अनोख्या उपक्रमाने सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे .

निसर्गाचा संतुलन बिघडलेला असून संपूर्ण पृथ्वीवर याचे विपरीत परिणाम होत आहे याला कारणीभूत म्हणजे वृक्षतोड. त्यामुळे हवामानात बदल होऊन अनेक घटना बघावयास मिळत आहे आणि याचे परिणाम पशू पक्षी जीवजंतु व मानवावर सुद्धा पहावयास मिळत आहे. यावर एकच पर्याय असून वृक्षलागवड महत्वाचे आहे. हाच संकल्प करीत मंगेश धाडसे यांनी स्मशानभूमीत अनेक प्रकारच्या जातीचे झाडांची लागवड केली . सदर वृक्षरोपणाचे संदेश समाजातील प्रत्येक नागरिकांना द्यावे आणि प्रत्येकांनी वृक्ष रोपण करून वृक्षाची काळजी घ्यावी व फायदे व नुकसान जनतेला कळावे असा यामागील उद्देश असल्याचे मनोगत धाडसे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी वृक्षारोपण करताना मंगेश धाडसे ,डॉ गजभे, ग्रामसेवक पटले, व्यवस्थापक विनोद बारसागडे महिला मंडळी गावकरी उपस्थित होते