प्रवासी ऑटो उमा नदीवरील पुलाखाली कोसळला

72
  •  महिला गंभीर ,दोन जण किरकोळ जखमी
  • नेरी – चिमूर मार्गावरील घटना

नेरी,

चिमूर -नेरी मार्गावर उमा नदीवरील नेरी जवळील पुलावरून एक प्रवासी ऑटो  नदीत कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. यात एक महिला गंभीर जखमी झाली तर दोन जण किळकोर जखमी झाले.

सदर प्रवाशी ऑटो हा नेरी येथील दिनकर कामडी यांच्या मालकीचा आहे. ते नेहमीप्रमाणे नेरी वरून प्रवाश्यांना घेऊन चिमूर ला गेले होते आणि परत नेरीला प्रवाशी घेऊन येत असताना सदर घटना घडली या आटोत एक महिला व दोन जण प्रवाशी  बसले होते आटो नेरी जवळील नदीवरील पुलाजवळ येताच आटोचा एकसेल तुटल्याने चालकाचे आटोवरील नियंत्रण सुटले आणि आटो सरळ नदीत पडले आटो नदीत कोसळणार असल्याचे समजताच दोन इसमानी आटोतून उडी मारली त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले तर आटो चालक व महिला ही आटोसाहित नदीत कोसळले आणि आटोत दबले सदर घटनेची माहिती रहदारी करणाऱ्या नागरिकांना कळताच त्यांनी तात्काळ नदीत जाऊन फसलेल्या महिलेला व चालकाला बाहेर काढले सुदैवाने जिवीतहानी टळली सदर आटो जेसीबी च्या साह्याने बाहेर काढण्यात आले आहे सदर घटना ही नदीच्या पुलाला सवरक्षण कटळे नसल्याने घडली असल्याचे नागरिक बोलीत आहेत अनेक वर्षांपासून कटळे लावले नसल्याने अपघात झाला तेव्हा नदी पुलावर कटळे लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत