ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रमात वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

117

 

गडचांदूर.   ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था व गौसेवा केंद्र कोलांडी/नंदप्पा येथे दिनांक 6 ऑगस्ट ला अधिकमास कार्यक्रम निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम , गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.

.     आश्रम कमिटी कडून सत्कार मूर्ती .पूर्विता वा. मून (एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात 7वी मेरिट) या मुलींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .स्मिता अनिल चिताडे (मुख्याध्यापक.महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर) यांच्या हस्ते 125गरीब लहान मुलांना नोटबुक पेन बॅग शालेय साहित्य वाटप करण्यात आले

.     यावेळी  प्रमुख अतिथी डॉ.अनिल चिताडे (डीन सायन्स अँड टेकनोलोजी विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली) मार्गदर्शक .स्मिता अनिल चिताडे .(मुख्याध्यापक.म.गांधी विद्यालय गडचांदुर ) बा.ना.मोहितकर (माजी.मुख्याध्यापक म.गांधी विद्यालय गडचांदुर  एल डी मोहितकर (माजी उपमुख्याध्यापक म.गांधी विद्यालय गडचांदुर ). रमेश भालेराव ,डॉ किसनराव भोयर.,अरुण रागीट सरपंच पालगाव आणि सत्कार मूर्ती . पुर्विता मून या सर्व मान्यवरानी मार्गदर्शन केले , कार्यक्रमाला  विठ्ठल दाते, विलास भटवलकर ,रुपेश लोण गाडगे, पावडे गुरुजी, संजय बल्की,बोडे पाटील,अतुल धोटे, मधुकरराव चापले , वैभव गुंडावार बेला,विठ्ठल चींतलवार, विनोद हेपट ,वैद्य सर , तसेच 200ते 250भक्तांची उपस्थित होती,  शंकरराव देवाळकर(अध्यक्ष/संस्थापक. ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था व गौ सेवा केंद्र कोलांडी )यांनी आश्रामाबद्दल आपल्या आध्यात्मिक प्रवास,सुरुवाती पासून व पुढे होणाऱ्या आश्रमातील कार्य बद्दल अनुभव व मनोगत व्यक्त केले,

.      संचालन संतोष पोडे यांनी केले या कार्यक्रमाला  बळी  हेपट, अशोक केवट, वसंता काळे,  नंदकिशोर चिडे,  प्रदीप कुंभे, अनिल वडस्कर, धर्मराज पारधे, संतोष झाडे,नरेंद्र बोरकर,संजय शिंदे,केशव वाघमारे, नंदा देवाळकर, शुभांगी  हेपट,मंदा  वडस्कर,शामल  पार्धे,विमल केवट,आशा झाडे,शोभा  हुलके ,अनुराधा  शिंदे,या सर्व आश्रमातील सेवेकऱ्यानी कार्य क्रमासाठी मेहनत घेतली तसेच भक्तांना महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली