आनंद निकेतन महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा संपन्न

148

वरोरा –  आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय वरोरा ची पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा दि ५ ऑगस्ट २०२३ ला थाटात संपन्न झाली.

  1.           कार्यक्रमाची सुरुवात दीप-प्रज्वलनाने व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.मृणाल काळे तर प्रमुख उपस्थिती उप-प्राचार्य प्रा.राधा सवाने,पर्यवेक्षक प्रा.उषा गालकर,प्रा.रमेश पळसुटकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालक-शिक्षक संघाकरीता सदस्यांची निवड करण्यात आली. या सदस्यांमधून श्री. संजय थूल यांची उपाध्याक्ष म्हणून , वर्षा मेश्राम यांची सचिव तर प्रा. रमेश पळसुटकर यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली.

प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी सांगितले की,श्रद्धेय बाबा आमटे यांनी,आनंद निकेतन महाविद्यालयाची स्थापन शेवटच्या व वंचित घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केली व तो वसा आजही महाविद्यालयाने जपलेला असून पालकांनी आपल्या पाल्यांकडे बदलत्या वातावरणात विशेष लक्ष देण्याबाबत आवाहन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच शिक्षणाचा उपयोग उद्योजकता विकासासाठी होण्याचे सामर्थ्य या धोरणात असेल असे स्पष्ट केले. उपप्राचार्य सौ. राधा सवाने यांनी वेळेच्या व्यवस्थापनाचा उपयोग,पाल्यांचा आत्मविश्वास व सकारात्मकता विकास कसा होईल याकडे पालकांनी लक्ष द्यावे असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना दबाव व ताण न देता त्यांच्यासोबत मैत्रीभावाणे संवाद साधावा असे मत पर्येवेक्षक प्रा. उषा गालकर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची जबाबदारी शिक्षकांपेक्षा पालकांचीच जास्त आहे असे प्रतिपादन पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष .संजय थूल यांनी केले. नवनिर्वाचित सहसचिव प्रा. रमेश पळसुटकर यांनी पालक शिक्षकांच्या ऋणानुबंधाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा असे सुचविले.

पालक-शिक्षक संघाच्या सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून महाविद्यालयात आयोजित झालेल्या कागदापासून फुले बनविणे या कौशल्यपूर्ण स्पर्धेचे बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यामध्ये प्रथम सुजितकुमार राम, व्दितीय दिव्यानी टेमुर्डे व तृतीय साक्षी किन्नाके क्रमांक यांनी पटकाविले. उत्तेजनार्थ बक्षिसे बाकी सहा विद्यार्थ्यांनी पटकविले.

माजी सचिव प्रा. सीमा नागरारे यांनी सन २०२२-२०२३ च्या पालक-शिक्षक संघाच्या सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन केले. पालकांमधून . वर्षा मेश्राम ,. चंद्रहास मोरे, काकडे, प्रा.गोपाळ वरुटकर यांनी मनोगत व्यक्त केले. कागदी फुले स्पर्धा बक्षिसे वितरणाचे संचालन, स्पर्धेचे परीक्षक प्रा.दीप्ती चिटणीस यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निलेश जोशी यांनी तर उत्कृष्ट संचालन प्रा.डॉ.मानसी काळे यांनी केले.आभार प्रा. स्मिता पांढरे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.