कर्णबधिर मुलांची श्रवण चाचणी त्वरित सुरु करा

39
  •  युवासेनेचे जिल्हा सामान्य रुग्णालयाला निवेदन 

चंद्रपुर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवासेना जिल्हाप्रमुख मनिष जेठानी यांच्या नेतृत्वात जिल्हा आरोग्य अधिकारी  शासकीय जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांना कर्णबधिर मुलांची श्रवण चाचणी लवकरात लवकर करण्याबाबत निवेदन देण्यात आली.
चंद्रपूर जिल्हामध्ये कर्णबधिर शाळा अनेक आहे. अश्या शाळेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून आर्थिक दृष्ट्या मागासेलेले असतात . त्याचे पालक मोलमजुरी करुन कुटुंबाचा  उदरनिर्वाह करतात.
कर्णबधिर मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी कर्णबधित्वचे प्रमाणपत्र सादर करणे आव्यश्यक असते तसेच शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील हे प्रमाणपत्र महत्वाचे असते.सदर प्रमाणपत्र हे कर्णबधिर मुलांची श्रवणचाचणी करुन श्रवणनुसार दिले जाते.जिल्हा सामान्य रुग्णालयातून सरकारी रुग्णालयातील बेरा चाचणी करणे अनिवार्य केले आहे.चंद्रपूर जिल्ह्या शासकीय रुग्णालय मध्येबेरा चाचणी मशीन येऊ सुद्धा अजून पर्यंत सुरु करण्यात आली नाही.
सामान्य कुटूंबातील मूकबधिर मुलांची तथा कुटूंबायाची नागपूर आणि वर्धा जाताना आर्थिक बुदंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असुन त्वरित चाचणी सुरु करा अन्यथा नाही तरी युवासेना तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी यांनी दिला.
त्यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश जिवतोडे, युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले, युवासेना उपतालुका प्रमुख अमोल रोडे, समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.