भद्रावती रोटरी क्लब विविध पुरस्काराने सन्मानित

172
  • गांधी सिटी वर्धा येथे पार पडला जिल्हा पुरस्कार सोहळा

भद्रावती :

. गांधी सिटी वर्धा येथे जिल्हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यात २०२२ -२३ या रोटरी वर्षाकरिता अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद ,सचिव रोटे अनिल धानोरकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि इतर रोटरीयन्स यांच्या संकल्पनेतून अनेक

पुरस्कार स्विकारताना भद्रावती रोटरी क्लब चे पदाधिकारी

कार्यक्रम राबविण्यात आले त्या अनुषंगाने रोटरी क्लब भद्रावतीला विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

. रोटरी क्लब भद्रावती रोटरी ३०३० तर्फे मेंबरशिप ग्रोथ अवार्ड, १०० टक्के मेंबर द रोटरी फाउंडेशन फंड अवार्ड ,बेस्ट पब्लिक रिलेशन अवार्ड, मेंबरशिप डेव्हलपमेंट अवॉर्ड ,लोकांच्या जीवनात रोटरीची कल्पना करण्यात मदत करण्यासाठी रोटरी रिटाशन अवार्ड, फेलोसेपी अवॉर्ड ,तसेच रोटरी क्लब भद्रावतीचे पास्ट प्रेसिडेंट रोटे भाविक तेलंग यांना डिस्ट्रिक्ट ग्रीटिंग चेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे डॉ. आनंद झुनझुनवाला पीडीजी महेश मोकलकर रोटे पात्रीकर सर यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले त्यामध्ये कोषाध्यक्ष २०२२-२३ रोटे सुधीर पारधी, विवेक आकोजवार ,विनोद कांमडी ,किशोर खंडाळकर, विक्रांत बिसेन ,सुनील पोटदुखे ,किशोर भोसकर प्रकाश पिंपळकर, सुरेंद्र राऊत ,वसंत उंमरे ,डॉ. अमित प्रेमचंद व रोटे रुकसाना शेख उपस्थित होते.