वेकोलीच्या कुचना मुख्यालयासमोर इंटकचे धरणे आंदोलन 

154

 

सुधीर पारधी भद्रावती प्रतीनिधी

नवामार्ग न्युज नेटवर्क

कामगाराची सुरक्षितता कायदेशीर अधिकार कल्याणकारी योजनांची पूर्तता व अन्य न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी इंटक कामगार संघटनेच्या राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघातर्फे शुक्रवारी सकाळी ११ वाजता वेकोली माजरी क्षेत्राच्या कुचना मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन तथा सांकेतिक उपोषण करण्यात आले.

माजरी क्षेत्रातील इंटक संघटनेचे अध्यक्ष धनंजय गुंडावार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात व उपोषणात वेकोली माजरी क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला एस सी एस टी कामगारांचा अनुशेष भरून काढावा, भूमिगत कामगारांना अद्यावत सुरक्षितता प्रदान करण्यात यावी, महिला आश्रितांना प्रशिक्षण देण्यात यावे, खाणीच्या परिसरातील वन्यजीवापासून कामगारांना सुरक्षा कवच द्यावे अशा विविध मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून वेकोली प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, सचिव परमानंद चौबे, संजय दुबे, हंसराज पारखी ,चंद्रकांत बोडाले, धर्माजी गायकवाड, सुनील श्रीवास्तव, अनिल सिंग, रवी आवारी, कृष्णा चांभारे, चिंतामण आत्राम, बाबा आस्वले सहभागी झाले होते.